आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:खंडेश्वर इंग्लिश मेडियम‎ स्कूलच्या वतीने जयंती‎

परंडा‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील खंडेश्वर इंग्लिश मेडियम‎ स्कूलच्या वतीने क्रांतीज्योती‎ सावित्रीबाई फुले जयंती निमित्त‎ विविध कार्यक्रमाचे आयोजन‎ करण्यात आले.‎ खंडेश्वर स्कूल मध्ये क्रांतीज्योती‎ सावित्रीबाई फुले यांची जयंती‎ साजरी करण्यात आली.यावेळी‎ डॉ.रमा मोरे यांनी सावित्रीबाई फुले‎ यांच्या जीवन चरित्र विषयी माहिती‎ सांगितली व डॉ. आनंद मोरे यांनी‎ आरोग्य व योगासन याबद्दल‎ विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले‎ व सकस आहार कसा असावा.‎ याविषयी मुलांना मार्गदर्शन केले.‎ नर्सरी ते इयत्ता पाचवी पर्यंत‎ विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा च्या‎ माध्यमातून ऐतिहासिक, सांस्कृतिक‎ व सामाजिक स्थितीचे दर्शन घडवून‎ दिले. इयत्ता आठवीतील मुलींनी‎ ''बेटी बचाव, बेटी पढाव'' या‎ नाटकाच्या माध्यमातून सामाजिक‎ संदेश दिला.‎

यावेळी संस्थापक नवनाथ बप्पा‎ खैरे, ऋषिकेश खैरे, सागर खैरे व‎ शाळेचे मुख्याध्यापक आप्पा कांबळे‎ संचालिका रोहिणी सातपुते, मेघा‎ खैरे, दिपाली मोरे व संजय जाधव,‎ विठ्ठल गोडगे, तसेच या कार्यक्रमात‎ पालकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला‎ तसेच विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक‎ कौतुकास्पद अभिनंदन केले. या‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आवेज‎ मुजावर व श्रेया सातपुते व तब्बसूम‎ पठाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी‎ करण्यासाठी शिक्षक अर्चना‎ बनसोडे , भिमाशंकर विभुते, अंकुश‎ पोळ, निकिता आगरकर, राधा‎ काकडे , सोनाली लाडे व इतरांनी‎ परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...