आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचोरी गेलेले दागिने, मोबाईल, दुचाकी परत मिळाल्यामुळे संबंधित नागरिकांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. घरात किंवा बाहेर कोठेही चोरी झाली तर गेलेला माल परत मिळण्याची सध्या शाश्वती राहिलेली नाही. मात्र, एसपी अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात अनेक चोऱ्यांचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे.
याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यातील चोरीला गेलेला संबंधितला मुद्देमाल देण्यासाठी विशेष माेहीम राबवण्यात आली. यामध्ये पोलिस अधिक्षक कार्यालयात एका कार्यक्रमात मुद्देमाल परत करण्यात आला. यासाठी अगोदरच न्यायालयीन प्रक्रिया राबवण्यात आली. गेल्या तीन महिन्यात पोलिसांनी वाशी ठाण्याच्या ३, उस्मानाबाद ग्रामीण ५, येरमाळा १, तुळजापूर ५, ढोकी १, तामलवाडी २, बेंबळी १ असा ऐवज पोलिस परत करणार आहेत.
जॅक टाकून वाहने लुटलेला मालही परत
काही दिवसांपूर्वी रात्री येडशी ते ढोकी रस्त्यावर रात्रीच्या दरम्यान चार जणांच्या टोळीने रस्त्यावर जॅक टाकून तीन वाहने लुटली होती. यामध्ये एक दुचाकीसह दोन जीपांमधील ८८ हजारांचा ऐवज लुटण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या धाडसाने टोळीला पकडले. यावेळी त्यांची मोठी चोरट्यांसोबत मोठी झटापट झाल्याचे एसपी कुलकर्णी यांनी सांगितले.
२५ तोळे सुनेनेच चोरले
उमरगा तालुक्यातील एका प्रकरणात वेगळाच प्रकार समोर आला. एका घरात सुनेनेच २५ तोळे सोन्याचे दागिने चोरून कोरड्या पाण्याच्या टाकीत ठेवले. तसेच दागिन्यांची चोरी झाल्याची आवई उठवली. पोलिसांनी घरातील सर्वांचे मोबाईल कॉल डिटेल्स, बोटाचे ठसे याचे अवलोकण केले. तसेच सर्वांच्या हालचालीवर बारिक नजर ठेवली. यामुळे सुनेने दागिने चोरल्याचे समोर आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.