आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी विजय प्राप्त केल्यानंतर लोहारा शहरात शुक्रवारी (दि. ३) राष्ट्रवादी शिक्षक संघटना लोहारा तालुका व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून पेढे भरवत जल्लोष केला. मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२) औरंगाबाद येथे पार पडली. यात महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजय प्राप्त करून हा मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे.
आ. विक्रम काळे विजयी झाल्याबद्दल लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, नगरसेवक प्रशांत काळे,के.डी. पाटील, जुक्टा संघटनेचे लोहारा तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, प्रा. सुनील बहिरे, प्रा. राजेंद्र साळुंके, प्रा.आर.सी.अष्टेकर, प्रा.कुलकर्णी, दत्ता जावळे, अंकुश शिंदे, धनराज धनवडे, महेबूब गवंडी, हरी लोखंडे, शाम नारायणकर, रघुवीर घोडके, आयनोद्दीन सवार, प्राचार्य दौलतराव घोलकर, जी.डी.मैंदाड, प्रकाश भगत, जाधव,डी.एम.पोतदार,एम .टी.भोसले, एस.के.जाधव,बी.जे.मनो हर,बी.एस.स्वामी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.