आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी‎:तलमोड येथील प्रशालेत जयंती साजरी‎

उमरगा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तलमोड येथील‎ छत्रपती शिवाजी विद्यालयात‎ महिला शिक्षणाच्या पुरस्कर्त्या आद्य‎ शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई‎ फुले जयंती व बालिका दिन‎ उत्साहात साजरा करण्यात‎ आला.शिक्षिका अश्विनी बिराजदार‎ अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी‎ मुख्याध्यापक जयवंत मोरे, ललीता‎ पवार आदी उपस्थित होते. प्रारंभी‎ सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन‎ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.‎ सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व‎ सामाजिक कार्याची माहिती‎ विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणा मधुन‎ दिली. कु प्रतिक्षा शिंदे हिने‎ सुत्रसंचलन केले.

ललिता पवार‎ यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी‎ सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.‎ यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालक‎ उपस्थित होते.‎ मुरूम येथील प्रतिभानिकेतन येथे‎ जयंती‎ मुरूम येथील प्रतिभा निकेतन‎ विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई‎ फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या‎ स्मृतीला अभिवादन करुन बालिका‎ दिवस साजरा करण्यात आला.‎ यावेळी पाचवीच्या विद्यार्थिनींनी‎ शिक्षणाचे महत्व सांगणारी नाटिका‎ सादर करण्यात आली.‎ मुख्याध्यापिका एम. बी. रोडगे,‎ उपमुख्याध्यापक यु. एस. घुरघुरे,‎ पर्यवेक्षक पी. व्ही. सगर, व्ही. बी.‎ परसाळगे, शिक्षक, शिक्षिका,‎ कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...