आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जाधव कॉम्प्लेक्स समोरील परिसरात महाराणा प्रताप यांची ४८२ वी जयंती गुरुवारी (दि. २) उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मोघल बादशहा अकबर यांनी राजस्थानमधील अनेक संस्थानांवर आक्रमणे केली, तेव्हा महाराणा प्रताप यांनी अकबराच्या हाताखाली राज्य करण्यास नकार दिला. अकबराने महाराणा प्रताप यांच्या चितोड संस्थानावर हल्ला केला. त्यावेळी महाराणा प्रताप यांनी आपली राजधानी गोंगुड येथे हलवली आणि मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला. गोंगुडमध्ये नवी राजधानी वसवल्यानंतर महाराणा प्रताप यांनी अभेद्य किल्ला बांधला आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज फौज निर्माण केली. अकबर आणि महाराणा प्रताप यांचे हळदी घाटातील युध्दात महाराणा प्रताप हरले परंतु त्यानंतरही महाराणा प्रताप अकबराच्या हाती लागले नाही. महाराणा प्रताप यांनी अकबराशी गनिमी काव्याने लढा देत मोघल सैन्याला घाम फोडला. अकबराचा खजिना लुटला, रसद तोडल्याने मोघल फौज हैराण झाली. मोघल अकबराची फौज माघारी परतताच महाराणा प्रताप यांनी सर्व किल्ले परत जिंकून घेतले आणि १२ वर्षे राज्य केले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड, राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू रणजित ठाकूर, पोलीस अधिकारी महेश क्षीरसागर, उमेश स्वामी, धर्मराज जाधव, मीनाक्षी दुबे, धनराज गिरी, सचिन शिंदे, अमरसिंह चव्हाण, सरदारसिंग चव्हाण, अभय चव्हाण, हनुमान राजपूत, अरुण तिवारी, राजू दुबे, कृष्णा चव्हाण, महेश दुबे, अजय चव्हाण, अतिष ठाकुर, संगमेश मस्कले, पृथ्वीराज दुबे, बाळू तिवारी, धीरज चव्हाण, गजु दुबे, नितीश ठाकूर, विनयकुमार तिवारी, रूपम राजपूत आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.