आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषित अनुदान वितरित करा:जुक्टा संघटनेचा बारावीच्या परीक्षेवर बहिष्काराचा इशारा

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घोषित अनुदान वितरित करा, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन ‘जुक्टा’ने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना दिले आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात बेमुदत संप तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा ‘ज्युक्टा’ने दिला आहे.

उस्मानाबाद जिल्हा ज्युनिअर कॉलेज प्राध्यापक संघटना अर्थात ‘जुक्टा’च्या वतीने दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर ‘जुक्टा’चे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश ननवरे, जिल्हा सचिव प्रा. प्रशांत भागवत यांच्यासह प्रा. राहुल पाटील, प्रा. प्रशांत धर्मसाले, प्रा. संतोष कुटे, प्रा. सुनिल क्षीरसागर, प्रा. मोहिते, प्रा. कांबळे आदी शिक्षकांच्या स्वाक्षरी आहेत.

संघटनेच्या प्रमुख मागण्या जुनी पेन्शन योजना १ नोव्हेंबर २००५ पूर्वीपासून कार्यरत व २००५ नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना लागू करा. }शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०, २०, ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करा. }घोषित अनुदान तत्काळ वितरीत करा. }शिक्षण सेवकांच्या मानधनवाढीचा आदेश त्वरित निर्गमित करा. }शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत.

बातम्या आणखी आहेत...