आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:कदम यांच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ माजी मंत्री रामदास कदम यांच्या प्रतिमेची गाढवावरुन धिंड काढून युवासेनेने तीव्र निषेध केला. तसेच प्रतिमेचे दहन करुन जोरदार घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात युवा सैनिकांनी रामदास कदम यांनी अवमानकारक भाषेत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात युवासेना शहरप्रमुख रवी वाघमारे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख वैभव वीर, शिवसेना शहरप्रमुख संजय (पप्पू) मुंडे, पंकज पाटील, हनुमंत देवकते, प्रदीप साळुंके, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख नीलेश शिंदे, बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, उपशहरप्रमुख सुरेश गवळी, विभाग प्रमुख अजित बाकले, राम साळुंके, पांडुरंग माने, अविनाश इंगळे, राज जाधव, ऋषी पाटील, नीलेश साळुंके, संकेत सूर्यवंशी, महेश लिमये, सत्यजित पडवळ, किरण बोचरे,रोहित भांडवले, बाळासाहेब पोतदार, शिरीष वाघमारे, प्रसाद तेरकर, सचिन बेद्रे, रवी खंडेराव, शुभम डांगे, अविनाश ईटकर, सूरज लोंढे, सागर शेरकर, शिवप्रताप कोळी, राकेश जाधव यांच्यासह शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...