आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कै. सि. ना. आलुरे गुरुजींनी आदर्श निर्माण करून अनेकांना घडवले. गुरुजींचे हे प्रेरणास्थळ समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ असून भावी पिढीला मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी कै. आलुरे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरण अभिवादन कार्यक्रमात केले. मंगळवारी (दि.२) प्रेरणास्थळी गुरुजींच्या समाधीचे पूजन करण्यात आले. महास्वामीजींच्या उपस्थितीत मान्यवरांसह शेकडो नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
स्मारक समितीचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण म्हणाले की, माझे सहकारी, मार्गदर्शक आलुरे गुरुजींनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, भोजन व निवासाची सोय केली. गुरुजींची शिस्त, गोरगरीब जनतेबद्दल असलेली कणव, दानशूरपणा, सामाजिक कार्यात पुढाकार व मदतीचा हात यामुळे ते अनेकांचे दैवत ठरले. यावेळी राजशेखर महास्वामीजी नदंगाव, शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी अणदूर, सुतरेश्वर महास्वामीजी अचलेर, विरंतेश्वर महास्वामीजी केसरजवळगा, गंगाधर महास्वामीजी जेवळी उपस्थित होते. कार्यक्रमास उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते रेवणसिद्ध लामतुरे, अॅड. लक्ष्मीकांत पाटील, श्री खंडोबा पणन संस्थेचे चेअरमन सुनील चव्हाण भालचंद्र बिराजदार, माजी प्राचार्य गुरुसिद्धप्पा साखरे जेवळी, जि. प. माजी अध्यक्ष शिवदास कांबळे व अस्मिता कांबळे, तुळजाभवानी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सिद्रामप्पा खराडे, अॅड. नागनाथ कानडे, सरपंच रामचंद्र आलुरे, महादेवप्पा आलुरे, अॅड. दीपक आलुरे, शामराव आलुरे, विक्रम आलुरे, विविध गावांचे सरपंच, सोसायटी चेअरमन, अधिकारी, पदाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
गणवेष, पुस्तकांचे वाटप
बसवराज शास्त्री, तीर्थ यांनी पौरोहित्य केले. विद्यार्थ्यांना शालेय गणवेष व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य उमाकांत चनशेट्टी यांनी तर एम. बी. बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.