आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच कोण:काक्रंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी बहुरंगी लढत; सर्वांचे लक्ष

काक्रंबा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील काक्रंबा ग्रामपंचायतीच्या १३ जागा होत असलेल्या निवडणूक आखाडयात सदस्य पदांसाठी ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर सरपंच पदासाठी गेली कित्येक वर्षांत यंदा प्रथमच ७ जण गुडघ्याला बाशिंग बाधून निवडणूक रिंगणात उतरलयाने काक्रंबा ग्रा.पं.निवडणूक बहुरंगी लढत होत आहे. चिन्ह वाटप झाल्यापासून प्रचाराने मात्र राजकीय वातारण ढवळून निघाले असले तरी विकासाच्या मुद्दयावर कोणीही उमेदवार स्पष्ट बोलत नाही. मात्र यंदाच्या निवडणूकीत तरूण वर्ग सहभागी झाल्याने घराणेशाही चा वारसा जपणाऱ्या मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागत आहे.

काक्रंबा ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण प्रर्वगासाठी खुले असल्याने यंदाच्या निवडणुक आखाडयात गेली कित्येक वर्षानंतर तरुण सुशिक्षित वर्ग सहभागी झाले आहे. इच्छुक सुरूवाती पासुन गुडघ्याला बांशिग बाधून रिंगणात उतरले असून निवडणूक विभागाने उमेदवाराना चिन्ह वाटप केल्यानंतर प्रचार धुमधडाक्यात सुरू झाला आहे.

गेल्या ग्रा.प.निवडणूक वर्षापासून सरपंच निवड ही थेट जनतेतून होत असल्याने निवडणुकीला विशेष महत्त्व आलेले आहे. शिवाय गावच्या विकासाला मिळणारा शासनाचा निधीदेखील ग्रामपंचायतीला मिळणार असल्यामुळे निवडणुका अटीतटीच्या व चुरशीच्या होतील. काक्रंबा जि.प.मतदार संघच संपूर्ण तालुक्यात काँग्रेस पक्षाचा बालेकिला म्हणून ओळखला जातो. गेली कित्येक वर्षापासून काक्रंबा जि.प.गटासह गटातील ग्रामपंचायतीवर काँग्रेसने एक हाती सत्ता कायम ठेवली होती.

मात्र गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत काँग्रेस मध्ये दोन गट पडून काक्रंबा ग्रा.पं. काँग्रेसच्या हातून गेली होती. दोन्ही गट वेगवेगळे झाले असल्याने एका गटाने महाविकास आघाडीचा धर्म पाळत त्यांच्या सोबत युती केली तर दुसऱ्या गटाने काही ठराविक पदधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनेल तयार केले आहे. तसेच यंदाच्या बहुरंगी लढतीत मतदारराजा कुणाला कौल देणार हे चित्र २० तारखेला स्पष्ट होणार आहे.

मातब्बरांचे पॅनेल अपूर्णच, विकासाच्या मुद्दयावर ताेंडावर बोट काक्रंबा ग्रामपंचायतीच्या होत असलेल्या निवडणूक रिंगणात गेली कित्येक वर्षानंतर यंदा प्रथमच गावातील सुशिक्षित तरुण भाग घेऊन उतरल्याने इच्छुकांची संख्या सुरूवाती पासुन मोठी होती. सरपंच पदासाठी तरुणासह ग्रामस्थांनी यंदाच्या निवडणूकीत वर्षानुवर्षे घराणेशाहीचा राजकीय वारसा जपणाऱ्या प्रस्थापितांना शह देण्यासाठी मोठे प्रयत्न केले.

गेली कित्येक वर्षे गावचे राजकारण करणाऱ्यांना पॅनेलसाठी उमेदवार मिळु शकले नाहीत. त्यामुळे त्याचे पॅनेलही अपूर्ण असून अनेकांनी तर घरातीलच लोकांचे प्रत्येक प्रभागात अर्ज भरून सारवासारव केली आहे. आता ४१७९ मतदाराच्या हाती सरपंच व सदस्यांचे भवितव्य आहे. मात्र शेवटच्या क्षणी मतदाराजा सरपंच पदाच्या विजयाची माळ कुणाच्या गळयात घालणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...