आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी:काक्रंबा ग्रा.पं. निवडणूक आखाड्यात तरुणाईपुढे मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला

काक्रंबा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील काक्रंबा ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी सुरू असलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, यंदाच्या निवडणूक रिंगणात सुशिक्षित तरुणवर्ग मोठ्या संख्येने उतरल्याने वर्षानुवर्षे घराणेशाहीचा राजकीय वारसा असलेल्या मातबर व प्रस्थापित नेते मंडळीसह आजी-माजी पदधिकाऱ्यांची पंचायत झाली आहे. यंदाच्या अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या निवडणूक रिंगणात तरुण वर्गांना शह देण्यासाठी एकेकाळी एकमेकांचे हाडवैरी एकत्र आल्याने सुशिक्षित मतदार ग्रामस्थांनी बदल घडवण्याचा मानस केला आहे .

तुळजापूर तालुक्यातच राजकीय दृष्टीने महत्त्वाची व मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काक्रंबा ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण प्रर्वगासाठी खुले असून यंदाच्या निवडणुक आखाडयात इच्छुक, सुरूवातीपासूनच गुडघ्याला बांशिग बाधून रिंगणात उतरले आहेत त्यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल केल्या दिवसापासून राजकीय हालचालीने चांगलाच पेटला अाहे. गत पंचवार्षिक ग्रा.प.निवडणूक वर्षापासून सरपंच निवड ही थेट जनतेतुन होत असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीला विशेष महत्त्व आलेले आहे.

शिवाय गावच्या सर्वागीण विकासाला मिळणारा शासनाचा निधी देखील ग्रामपंचायतीला मिळणार असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकां अटीतटीच्या व चुरशीच्या पहायला मिळणार आहेत काक्रंबा जि.प.मतदार संघच संपूर्ण तालुक्यात काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेली कित्येक वर्षापासून काक्रंबा जि.प.गटासह गटातील ग्रामपंचायतीवर काँग्रेसने एक हाती सत्ता कायम ठेवली होती.

मात्र गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत काँग्रेसमध्ये दोन गट पडून कार्यकर्ते व पदधिकारी यांच्यातील अंतर्गत मतभेदामुळे महत्त्वाची काक्रंबा ग्रा.प.च्या काँग्रेसच्या हातून गेली. यंदाच्या निवडणूकीत असे चित्र निर्माण झाले आहे. दोन्ही गट वेगवेगळे झाले असल्याने एका गटाने महाविकास आघाडीचा धर्म पाळत त्यांच्या सोबत युती केली तर दुसऱ्या गटाने कांही ठराविक पदधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनेल तयार केले आहे.तसेच यंदाच्या अटीतटीच्या व चुरशीच्या चौरंगी लढतीत मतदारराजा कुणाला कौल देणार हे चित्र २० तारखेला स्पष्ट होणार आहे .

४१७९ मतदार ठरवणार गावचा सरपंच
काक्रंबा ग्रा.पं.च्या होत असलेल्या निवडणूक रिंगणात गेली कित्येक वर्षानंतर यंदा प्रथमच गावातील सुशिक्षित तरुण उतरले असून इच्छुकांची संख्या मोठी असली तरी निवडणूक रिंगणातुन माघार कोण घेणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार अाहे. तरुणांसह ग्रामस्थांनी यंदाच्या निवडणूकीत वर्षानुवर्षे घराणेशाहीचा राजकीय वारसा पोसणाऱ्या मातबर व प्रस्थापितांना शह देण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात असून गावची एकुण स्त्री पुरुष मतदार संख्या ४१७९ एवढी अाहे. या मतदाराच्या हातीच सरपंच पदाचे गुडघ्याला बांशिग बांधलेल्याचे नशिब अाहे. शेवटच्या क्षणी मतदाराजा सरपंच पदाच्या विजयाची माळ कुणाच्या गळयात घालणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे .

बातम्या आणखी आहेत...