आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:कळंब पालिका; सर्वसाधारणकरिता 16 जागा शक्य, 10 प्रभागांत 20 नगरसेवक

कळंब19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज काढण्यात येणार नगरसेवक, सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत

प्रदीर्घ कालावधीनंतर नगरपालिका निवडणुकीच्या हालचालीने वेग घेतला आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे व नवीन दोन प्रभाग वाढल्याने सर्वसाधारणकरिता १६ जागा असण्याची शक्यता आहे. सोमवारी नगरसेवक सदस्यपदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील काही महिन्यांपासून ओबीसी आरक्षणावरून निवडणुका लांबणीवर पडल्या होता. न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली. कळंब नगरपालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत आठ प्रभागात १७ नगरसेवक व जनतेतून एक नगराध्यक्ष निवडुन आले होते. यावर्षी नवीन प्रभाग रचनेनुसार दोन प्रभाग व तीन नगरसेवकांच्या जागा वाढल्या असून १० प्रभागात २० नगरसेवक असणार आहेत. प्रभाग आरक्षण संदर्भात दिनांक १३ जून रोजी प्रभागाचे आरक्षण सोडत तहसील कार्यालयाच्या सभागृहात करण्यात येणार आहे.

मागील निवडणुकीत सर्वसाधारणच्या आठ जागा होत्या. यावेळी ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसींच्या पाच जागा सर्वसाधारणमध्ये गेल्या आहेत. तसेच वाढलेल्या प्रभागातील तीन नगरसेवकांच्या जागाही सर्वसाधारणमध्ये असणार आहेत. एकूण १६ जागा सर्वसाधारणसाठी असण्याची शक्यता आहे. यात महिला व पुरुषां करिता कोणता प्रभाग असणार, याकडे लक्ष लागले आहे.

अनुसूचित जातीच्या ३ जागा कायम
मागील पंचवार्षिकमध्ये अनुसूचित जातीच्या ३ जागा होत्या. यावेळी सुध्दा प्रभाग क्रमांक ३, ४ व ८ या मध्ये अनुसूचित जातीच्या तीन जागांकरिता आरक्षण असणार आहे. मागील वेळी प्रभाग क्रमांक ८ मध्ये अनुसूचित जमाती पुरुषाचे आरक्षण होते. यावेळी अनुसूचित जाती महिलेचे आरक्षण असणार आहे.

ओबीसींच्या पाच जागा कमी
मागील निवडणुकीत कळंब नगरपालिकेत ओबीसीच्या पाच जागा व ओबीसी महिला नगराध्यक्ष असे आरक्षण होते. मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या ओबीसींच्या पाच जागा कमी झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...