आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील बौध्दविहार गल्ली येथे नळाव्दारे पाणी येत नसल्याची तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. शहरातील बौध्दविहार गल्ली येथे १ वर्षापासुन घरगुती पाईपलाईन पाणी येत नाही, त्याचप्रमाणे बौध्दविहार गल्लीतील महिलांनी पाईपलाईन बददल कार्यालयात येवुन वारंवार समस्या मांडलेल्या आहे तरी देखील तरी प्रशासनाने जाणीपुर्वक दुर्लक्ष केलेले आहे. बौध्दविहार गल्लीतील लोकांचे पाण्यासाठी आतोनात हाल होत आहेत पाण्यासाठी दुरवर भटकंती करावी लागत आहे तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दयावे जेणे करुन नागरीकांच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. तरी यापुढे बौध्दविहार गल्लीती पाणी प्रश्न न सुटल्या बहुसंख्येने बौध्दविहार, समता नगर पु. सावरगांव गल्लीतील नागरीकां मार्फत न. प. समोर तिव्र अंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. या निवेदनावर लखन गायकवाड, अमर शिंदे, अम्रपाली आवाड, रंजणा गिरी, निखिल धावारे, स्वाती गवळी, गोदावरी सोनवणे आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत. उन्हाळा आता संपत आलेला आहे.पावसाळयात नागरी समस्या वाढण्यापूर्वी पाण्याची ही समस्या सोडविण्याची मागणी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.