आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरफोडीच्या वाढत्या गुन्ह्यामुळे नागरिक हैराण झाले होते. यासाठी कळंब येथील उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश यांच्या पुढाकारातून तुमच्या घराच्या रक्षणाची आमची जबाबदारी या नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना गावी जायच्या अगोदर पोलिसांना माहिती कळवावी लागणार असून, त्यानंतर त्या घराचे संरक्षण पोलिस करणार आहेत. या उपक्रमामुळे चोरीचे गुन्हे रोखण्यास मदत होणार आहे. या संदर्भात पोलिस प्रशासन जनजागृती सुध्दा करत आहे.
घराला कुलूप लावून अनेकजण आपल्या गावी किंवा बाहेरगावी कुटुंबीयासह जातात. घराजवळ सामसूम असल्याची संधी साधून चोरटे कुलूपबंद घरात चोरी करतात. त्या अनुषंगाने पोलिस दलाच्या वतीने घरफोडीचे गुन्हे रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश यांच्या पुढाकारातून तुमच्या घराच्या रक्षणाची आमची जबाबदारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कॉलनीत कोणीही संशयित व्यक्ती दिसल्यास त्याची तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
उपविभाग कळंब हददीतील चोरी, घरफोडी अशा गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निवा जैन पोलिस यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश यांच्या संकल्पनेतून कळंब, ढोकी, येरमळा, शिराढोण पोलिस ठाण्याच्या अंतर्गत प्रभारी अधिकारी यांना एप्रिलमध्ये हद्दीतील गावांना भेटी देऊन ग्रामरक्षक दल कार्यान्वित करून चोरी, घरफोडी यांना प्रतिबंध करण्याच्या उपाययोजना व आपल्या घराच्या सुरक्षेकरिता डोअर सेन्सर, लॉक सेन्सर, पोर्च सेन्सर यांचे प्रात्यशिक दाखवण्याबाबतच कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
८३६९९०७४२१ क्रमांकावर संदेश पाठवा
नागरिकांनी घराला कुलूप लावून गावी जायचे असल्यास ८३६९९०७४२१ या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर नाव व पत्त्यासह माहिती पाठवावी. संबधित कुटुंबीय घराकडे येईपर्यंत त्यांच्या घरात चोरी होऊ नये, यासाठी पोलिस यंत्रणेकडून रात्रंदिवस लक्ष ठेवले जाणार आहे. या संदर्भात पोलिस यंत्रणा जनजागृती सुध्दा मोठ्या प्रमाणात करत आहे.
उपविभाग कळंब हददीतील चोरी, घरफोडी अशा गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निवा जैन पोलिस यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश यांच्या संकल्पनेतून कळंब, ढोकी, येरमळा, शिराढोण पोलिस ठाण्याच्या अंतर्गत प्रभारी अधिकारी यांना एप्रिलमध्ये हद्दीतील गावांना भेटी देऊन ग्रामरक्षक दल कार्यान्वित करून चोरी, घरफोडी यांना प्रतिबंध करण्याच्या उपाययोजना व आपल्या घराच्या सुरक्षेकरिता डोअर सेन्सर, लॉक सेन्सर, पोर्च सेन्सर यांचे प्रात्यशिक दाखवण्याबाबतच कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
दि. १ एप्रिल रोजी रात्री ०८०० वा सुमारास कळंब शहरातील व्दारकानगरी, साईनगरी या भागातील १२५ ते १५० रहिवासी जनतेस एम रमेश उपविभागीय पोलिस अधिकारी कळंब, सोबत पोलिस निरीक्षक यशवंतराव जाधव यांनी येथील रहिवासी यांच्या सोबत संवाद साधून चोरी घरफोडी घडणाऱ्या गुन्हयांना प्रतिबंध कसे घालता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. उन्हाळ्याच्या काळात अनेक नागरिक परगावी जातात, अशा वेळी चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने ही बैठक महत्त्वाची होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.