आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:कळंबचा आठवडी बाजार म्हणजे घाणीचे आगार

कळंब22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आठवडी बाजार असुविधाचे आगार झाले असून शेतकऱ्यांना स्वत:चे व ग्राहकांचेही आरोग्य धोक्यात घालून भाजी विक्री करावी लागत आहे. ज्या ठिकाणी घाण होत आहे, त्या ठिकाणी स्वच्छता का करण्यात येत नाही असा प्रश्न उपस्थित होत असून तात्काळ घाणीच्या ठिकाणी मुरुम टाकण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

कळंब तालुक्याचे अर्थकारण हे शेतीवर अवलंबून आहे. कळंब शहराची बाजारपेठ मोठी असल्यामुळे शहरात सोमवारी आठवडी बाजार व इतर दिवशी सुध्दा चांगला बाजार भरत आहे. तालुक्यासह वाशी, केज तालुक्यातील शेतकरी सुध्दा येथे भाजी विक्री करीता येतात, विशेष म्हणजे दिवसेंदिवस भाजी विक्री करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजी घेणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र येथे घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे बाजारात मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. नगर पालिकेने आठवडी बाजारात पत्र्याचे शेड मारुन कट्टे केलेले आहेत. पण या ठिकाणी सुध्दा घाण आणि चिखल झाल्यामुळे अनेक भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसून भाजी विकावी लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...