आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कलदेव निंबाळा सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत ; चोरी, अवैध धंद्यांवर नियंत्रणास मदत

उमरगा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलदेव निंबाळा गावाचा आदर्श घेत इतर गावांनीही सीसीटीव्ही बसवावेत. गावात मुख्य परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत ठेवल्यास चोरी, अवैध धंदे, भांडणांवर नियंत्रण राहण्यास मदत होणार, असे मत मुरुम पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आर. एम. जगताप यांनी उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.

कलदेव निंबाळा हे सीसीटीव्हीच्या निगराणीत असलेले उमरगा तालुक्यातील पहिले गाव आहे. शुक्रवारी (दि.९) पोलिस उपनिरीक्षक जगताप व इंगळे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही चालु करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मुख्य रस्ता, चौक, आरोग्य उपकेंद्र परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यावेळी सरपंच सुनिता पावशेरे, ग्रामसेवक सुनिल पांचाळ, पोलीसपाटील पांडुरंग पाटील, चेअरमन तुकाराम बिराजदार, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बालाजी पाटील, ग्रापं सदस्य छायाताई भालेराव, बाबूराव पावशेरे, गणपतराव पाटील, कलाकार पाटील, मारुती गायकवाड, धनराज सूर्यवंशी, विठ्ठल कांबळे, रमेश पाटील, राहुल स्वामी, किरण स्वामी, रमाकांत पावशेरे, सुनिल बलसुरे, बाबूराव पाटील, प्रकाश पावशेरे, भागवत लड्डा, राजेंद्र ईटकर, मल्लिनाथ कारभारी उपस्थित होते. दरम्यान, सांस्कृतिक सभागृहात तरुण गणेश मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक जगताप व इंगळे यांना आदर्श तपासाबद्ल पुरस्कार मिळाल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणारे व्यंकटेश कॉम्प्युटरचे शिंदे, सिद्धार्थ गायकवाड, ग्रामसेवक सुनिल पांचाळ, राहुल देवरे यांचाही सत्कार झाला. जिल्हा परिषद प्रा. शाळा, शहीद भगतसिंग विद्यालयात आयोजित स्पर्धांचे बक्षीस वितरण झाले. यावेळी विक्रम कल्याणकर, विजय पाटील, कलेश्वर घंटे, राम पाटील, मारुती घोटमाळे, मारुती सुरवसे, विनोद डोणगावे, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. देविदास पावशेरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

आदर्श नागरिक बनावे
सरपंच पावशेरे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी मोबाइलचा योग्य वापर करावा, आपले आई-वडील व गुरुजनांची आज्ञा पाळावी. युवकांनी दिवसा स्वप्न पहावे. संस्कारीत होऊन आदर्श नागरिक बनावे. शालेय विद्यार्थिनी व युवतींनी अन्याय व शोषण झाल्यास पोलिस ठाणे अथवा ग्रामसुरक्षा दल व ११२ क्रमांकावर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...