आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्या सन्मान योजना सुरू:कन्या सन्मान चा खासदारांच्या हस्ते शुभारंभ

लोहाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपंचायतीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या वतीने प्रभाग सहा मध्ये बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते रविवारी (दि.१८) करण्यात आला.

प्रभाग क्रमांक सहा मधील सामान्य कुटुंबातील मुलींच्या कन्यादानासाठी सामाजिक बांधिलकी जपत आपलाही हातभार लागावा, यासाठी नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांच्या वतीने या योजनेचा येथे शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिक रघुवीर घोडके यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात पाच ग्रॅम सोन्याची अंगठी देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. नगरसेविका मयुरी बिराजदार यांनी घोडके यांची कन्या शिल्पा हिच्या हातात अंगठी घातली. या योजनेचा लाभ प्रभाग सहा मधील कुटुंबांना होणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागण्णा वकील, सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय बिराजदार, युवासेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, माजी पं. स. सभापती विलास भंडारे, माजी ग्रामपंचायत सदस्य महेबूब गवंडी, माजी पंचायत समिती सदस्य सुधीर घोडके, नितीन जाधव, रेबे चिंचोलीचे उपसरपंच पवन मोरे, प्रेम लांडगे, विकास घोडके, रवी कुलकर्णी, जगदीश लांडगे, प्रकाश भगत, राजेंद्र रवळे, तानाजी घोडके, शहाजी जाधव, आकाश विरोधे, राहुल विरोधे, आप्पु स्वामी, नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...