आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या आठवणी:काटगाव जि. प. शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा 22 वर्षांनंतर स्नेहमेळावा

नळदुर्गएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे जिल्हा परिषद प्रशालेतील २०००-१ मधील दहावी वर्गातील ४० विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात स्नेहमेळावा पार पडला. या वेळी शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला असून, अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत.

तुळजापूर तालुक्यातील काटगाव जिल्हा परिषद प्रशालेतील माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा स्नेहमेळावा २०००-१ मध्ये दहावी वर्गाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन मुख्यध्यापक विश्वनाथ रेड्डी हे होते. या वेळी मुलींनी सर्वप्रथम सर्व शिक्षकांचे ओक्षण करून स्वागत केले. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने आपल्या गुरुजनांशी आणि मित्रमैत्रिणींची भेट होऊन संबंध वृध्दींगत व्हावे, या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या स्नेहमेळाव्यासाठी व्यवसाय व नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला होता. दहावीच्या वर्गाला शिकवणाऱ्या व गुरुजनांचा शाल, फेटा, हार व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. दहावी बोर्ड परीक्षेनंतर आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटा शोधण्यासाठी बाहेर पडलेले वर्गमित्र एकत्रित भेटल्याने जुन्या आठवणीना उजाळा देत तब्बल २२ वर्षांनी भेटलेल्या आपल्या मित्र परिवारासोबत आनंद लुटला.

याप्रसंगी मुला, मुलींनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळीराम माळी, सूत्रसंचालन एम. एम. घाटवाले यांनी केले. उमेश गंगणे, महेश माळी, भीमाशंकर माळी, हनुमंत माळी, सूर्यकांत कांबळे, ज्ञानेश्वर माळी, सुलजा पवार, रोहिणी माळी यांच्यासह हरणाई युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

माजी विद्यार्थ्यांचे मनोगत
२२ वर्षांपूर्वीचे वर्गमित्र एकत्रित भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. भेटलेल्या मित्र परिवारासोबत आनंद लुटताना अनेकांना दहावीतील क्षण अनुभवावयास मिळाले. याप्रसंगी मुला, मुलींनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...