आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा अभाव:खामसवाडीत जि. प. प्राथमिक शाळेमध्ये पाण्याचे तळे

कळंब3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खामसवाडी येथील जि. प प्राथमिक शाळा येथिल पाच वर्गात पहिल्या पावसात तळे साचले आहे.परंतु शाळा सुरु होऊन आज आठ दिवस होत असताना पहिल्या पावसात अध्यापन सुरू असताना अचानक पाऊस होऊन सर्व वर्गात पाणी आल्याने शिक्षकांची धावपळ उडाली. सर्व विद्यार्थी स्लॅब मधिल वर्गखोलित एकत्र करुन पाऊस बंद झाल्यांतर घरी सोडण्यात आले.

पहिल्याच पावसात वर्गखोलीत पाणी आल्यामुळे मुले शाळेत पाठवायची का नाही, असा प्रश्न पालकामध्ये निर्माण झाला आहे. ग्रामिण भागात खाजगी शाळा नाहीत. परंतु विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शहरात पाठवायचे म्हटल्यानंतर प्रवास खर्च वाढतो. त्यामुळे गावातील जि. प. शाळेत पाठवतो. परंतु त्या ठिकाणी पावसाळ्यात ही अशी अवस्था असेल तर विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्याये कसे, हा प्रश्न विचारला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...