आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय दूर:खामसवाडी - कळंब रस्त्याचे काम चालू; गैरसोय दूर

खामसवाडी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथिल मुख्य मार्ग असलेला खामसवाडी - कळंब रस्ता अखेर प्रधानमंत्री सडक योजनेतून मंजुर होऊन तालुका हद्द ते खेर्डा पर्यंत कामास सुरुवात झाली. या कामासाठी ४८२.५५ लाख रुपये मंजूर असून या मार्गावरील शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दुर झाली आहे. दै .दिव्यमराठीने याबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध केल्याने आज त्या शेतकऱ्यांनी आभार मानले आहे. प्रत्येक वर्षी या मार्गावर शेतकऱ्यांचा हजारो टन ऊस तोडणीस येऊन रोडमुळे ऊस तूट नसल्याने उत्पन्न घटत होते. तसेच पावसाळ्यात याच मार्गावर दुध उत्पादक शेतकरी दुध घेऊन जाताना अपघातही झाले.

तालुक्याला जात असताना हा मार्ग जवळचा असल्याने वाहतूक भरपूर होती. परंतु रोड आहे का खड्डे कळत नव्हते त्यामुळे वाहन धारकांतुन समाधान व्यक्त होत आहे. नागझरवाडीचे बाबासाहेब माने यांनी दिव्य मराठीला धन्यवाद दिले आहेत. रोडचे काम प्रधानमंत्री सडक योजनेतुन होत असताना दर्जेदार होत आहे व मजबूतीकरण होत आहे त्यामुळे बरेच वर्षे टिकेल अशी आशा मनोज साळुंंखे यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...