आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटोत्थापन:खंडेरायाच्या नवरात्रास घटस्थापनेने प्रारंभ ;येळकोट येळकोट घे” च्या जयघोषात  घटस्थापना

तुळजापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडेरायाच्या नवरात्रास सोमवार (दि. २१) घटस्थापनेने प्रारंभ झाला. तुळजाभवानी मंदिरातील खंडोबा मंदिरात दुपारी १२ वाजता “येळकोट येळकोट घे” च्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली. मंंगळवार (दि. २९) चंपाषष्टी दिनी दुपारी १२ वाजता घटोत्थापनाने नवरात्राची सांगता होईल. तुळजाभवानी मंदिरातील उपदेवता खंडोबा मंदिरात महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत खंडोबाचे पुजारी सेवेकऱ्यांनी घटस्थापना केली. यावेळी धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, अभियंता राजकुमार भोसले यांचा सह सेवेकरी वाघे, मंदिर संस्थान चे कर्मचारी उपस्थित होते. नऊ दिवस चालणाऱ्या खंडेरायाच्या नवरात्राची (दि. २९) चंपाषष्ठी दिनी दुपारी १२ वाजता घटोत्थापनाने सांगता होईल.

बातम्या आणखी आहेत...