आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादची ओळख:खो-खो ने फिटनेस, नोकरी, आत्मविश्वास, संयम दिला

उस्मानाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील अनेक महिला व पुरुष खेळाडुंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवत इतिहास घडवला आहे. तसेच शारीरिक फिटनेस, चपळपता, संय्यम, टिमवर्क, हार जीत पचवण्याचे कौशल्य आत्मसात केले. पुर्वी मातीत स्पर्धा होत होत्या मात्र, सध्या मॅटवरील खो खो स्पर्धा होत असल्याने नवयुवकांना चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. राष्ट्रीय खो खो स्पर्धेमुळे उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख सर्वत्र झाली असून अनेक खेळाडूच्या जीवनाला कलाटणी मिळाल्याची भावना खो खो खेळातून नोकरी मिळवलेल्या खेळाडूंनी व्यक्त केल्या आहेत.

उस्मानाबाद शहरातील तुळजाभवानी क्रीडा मैदानावर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील महिला व पुरुष खो-खो स्पर्धा होत आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील खो खो खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवून तालुका क्रीडाधिकारी, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक यासह अन्य पद मिळवलेल्या खेळाडूंच्या भावना दैनिक दिव्य मराठीने जाणून घेतल्या. त्यामध्ये अनेक खो खो खेळाविषयी अभिमान व्यक्त केला असून खो खो खेळामुळेच आम्ही घडल्याची मत व्यक्त केले. हे सर्व घडवून आणण्यासाठी सिंहाचा वाटा डॉ. चंद्रजीत जाधव यांचा असल्याचे मतही खेळाडूंनी व्यक्त केले. तसेच अनेकांनी खो खो मुळे शारीरिक चपळता, फिटनेस व आत्मविश्वास मिळाल्याचेही सांगितले. स्पर्धेमुळे खो खो खेळाला चांगले दिवस निर्माण झाले असल्याची भावना दिसून आली.

खेळाकडे करिअर म्हणून पाहा
खो खो खेळामुळेच आज माझी ओळख असून पुणे शहरात क्राइम ब्रॅँचमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर काम करत आहे. त्याबरोबरच माझी पोलिस खात्यामध्ये खेळाडू म्हणून ओळख आहे. खेळाकडे करिअर म्हणून पाहिले पाहिजे. आमच्या सर्व गुरूंच्या परिश्रमामुळे उस्मानाबादचे खेळाडू घडले आहेत. त्यामुळेच उस्मानाबादचे नाव महाराष्ट्रात नव्हे तर भारतात ओळखले जाते.सुजाता शानमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पुणे.

खो खो मुळे ओळख व नोकरी
सुरूवातीला बहीण आश्विनी खटके हिने खो खो जॉइन केला असून ती खो खो नॅशनल आहे. त्यानंतर मी खो खो जॉइन करून २०१२ मध्ये पीएसआय होऊन एपीआय झालो आहे. सध्या मॅटवरचा खो खो आला आहे. खो खो मुळे नवी ओळख व नोकरी मिळाली आहे. युवकांनी प्रेरणा घेऊन जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार न्यावे.योगेश खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुणे शहर कोरेगाव पार्क.

दुर्लक्षित खेळाला चांगले दिवस
खो खो खेळाने संय्यम, टीमवर्क अन् आत्मविश्वास वाढवला असून सध्या मी लातूर येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर आहे. इतर खेळाप्रमाणे खो खो खेळालाही ग्लॅमर मिळाले आहे. दुर्लक्षित खेळाला चांगले दिवस आले असून नवीन खेळाडूंना प्रेरणादायी आहे. नवयुवकांना चांगला प्लॅटफॉर्म मिळाला असून आवश्यक सुविधा उपलब्ध होत आहे. यामुळे खेळात चमकदारी दाखवावी.नाना लिंगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक लातूर.

बातम्या आणखी आहेत...