आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन युवकांनी अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर टॉवर लोकेशनवरून पोलिसांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेत दोन अल्पवयीन मुलीसह दोघे तरुण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी ही कारवाई बुधवारी सकाळी दहा वाजता काळा मारुती मंदिराच्या पाठीमागे बाह्य वळण रस्त्यावर केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन अल्पवयीन मुलींना पळवुन नेल्या प्रकरणी सांगली जिल्ह्यात आटपाटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मोबाइलच्या टॉवर लोकेशनवरून शोध घेण्यास मंगळवारी (दि.१३) आटपाटी पोलिस ठाण्याचे कर्मचारी विकास जाधव व महेश आवळे उमरग्यात आले होते. उमरगा येथील पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम सुरू असताना शिवपुरी रोडवर दोघे युवक दुचाकीवरून जात होते. त्यांना पोलिसांची चाहुल लागताच दुचाकी सोडून पळून गेले.
या दरम्यानच्या काळात युवकांनी “त्या” दोन मुलींना उसाच्या शेतात लपवुन ठेवले होते. आटपाटी येथील पोलिसांनी दुचाकी जप्त करुन निघून गेले. मात्र, बुधवारी सकाळी पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार लक्ष्मण शिंदे, राम मेटे, अतुल जाधव, सय्यद अली खतीब, पोलिस कर्मचारी बाबासाहेब कांबळे, सिद्धेश्वर उंबरे यांनी सुरु केले होते. या शोध मोहिमेत १५ ते १६ वर्ष वयोगटातील दोन अल्पवयीन मुली व समाधान गोरख जावीर (२०) रा. कवठाळी ता. आटपाटी, विनायक बाळासाहेब कांबळे (२०) रा. शेटफळ ता. आटपाटी यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.