आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीस गावांचा यामागे व्यवहार:विकासासाठी किल्लारीला तालुक्याचा दर्जा आवश्यक

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किल्लारी हे गाव दोन जिल्ह्याच्या चार तालुक्याच्या सीमेवरील असून किल्लारी तालुका होण्यास पात्र आहे. या परिसरातील ६७ गावांचा येथे व्यवहार आणि संपर्क आहे. उमरगा तालुक्यातील जवळपास तीस गावांचा यामागे व्यवहार चालतो, त्यामुळे चार तालुक्याच्या सीमेवरील किल्लारीचा तालुका होणे ही परिसराची गरज आहे, असे मत दिल्ली शेतकरी आंदोलनातील शेतकरी नेते सेवाग्रामचे सुपुत्र विनायकराव पाटील यांनी व्यक्त केले.

किल्लारी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी, काँग्रेसचे महादेव पाटील यांच्या वतीने शनिवारी (दि.३१) आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी विविध सेवा सोसायटीचे अध्यक्ष किरण बाबळसुरे, किल्लारी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शरद भोसले, कारखान्याचे माजी संचालक महादेव पाटील, सरपंच बाळासाहेब देशमुख, विद्याधर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना शेतकरी नेते विनायकराव पाटील म्हणाले की, किल्लारी हे ३० हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावाचे महत्त्व व परिसरातील गावांना किल्लारीला तालुका केल्याने होणारा फायदा लक्षात घेता किल्लरीचा तालुका करण्याची मागणी फार जुनी आहे.

माझा या गावाशी लहानपणापासून संपर्क आहे. कुठल्याही छोट्या- मोठ्या कामासाठी उमरगा तालुक्यातून किल्लारी येथे यावे लागते. त्यामुळे उमरगा, लोहारा, निलंगा आणि औसा या चार तालुक्याच्या सीमेवरील गावांचा सर्व व्यवहार किल्लारी येथूनच होतो. यापूर्वीही किल्लारी तालुकानिर्मिती संघर्ष समिती अस्तित्वात होती. त्यावेळी डॉ. शंकरराव परसाळगे, निवृत्तीराव भोसले, गुंडाप्पांना बिराजदार, डॉ. राजेश गुंजोटे, सतीश भोसले आदी लोकांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना याबाबत वारंवार निवेदने देवून पाठपुरावा केलेला होता, असे पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...