आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘शिराढोणचा राजा’ने 32 वर्षांपासून जपले समाजभान ; झाडांची लागवड करून संवर्धनाचा संकल्प

शिराढोणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विठ्ठल रुक्माई गणेश मंडळाची ३२ वर्षांपासून वेगळी छाप आहे. शिराढोणचा राजा म्हणून ओळख असलेल्या या मंडळातर्फे समाजोपयोगी कार्य केले जात आहे. गणरायाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात येते. सामाजिक नाळ पक्की करत नाविन्यपूर्ण उपक्रमातून मंडळाने ओळख निर्माण केली आहे.

३२ वर्षापूर्वी महाजन गल्लीतील युवकांनी मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून प्रबोधनाचे कार्य सुरू आहे. वनराई बंधारे उभारणे, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गरीब विद्यार्थी दत्तक घेणे, स्त्रीभ्रूण हत्येबाबत जनजागृती, व्यसनमुक्ती, जलसंधारण व जलपूनर्भरणासारख्या भविष्याच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर जनजागृती करुन या मंडळाचे समाजकार्य सातत्याने सुरू आहे. यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव डोळ्यापुढे ठेवून मंडळ कार्यकर्त्यांनी ७५ वृक्षांचे वृक्षारोपण सार्वजनिक ठिकाणी केले आहे. या वृक्षांच्या संगोपनाची जवाबदारी प्रत्येक सदस्याने घेतली आहे. तसेच गणपती सजावट स्पर्धा, महालक्ष्मी सजावट स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदी स्पर्धांचेही या वर्षी अयोजन करण्यात आले आहे.

पारंपरिक वाद्ये, गुलालही नाममात्रच
श्री विठ्ठल रुक्माई गणेश मंडळाच्या आजपर्यंतच्या मिरवणूकीत एकदाही पारंपरीक वाद्याखेरीज इतर ध्वणीप्रदुषण घडवणाऱ्या वाद्याचा वापर केला नाही. मंडळाने स्वतःढोल, ताशा, लेझीम वाद्यांची खरेदी करुन स्वतःचे वाद्य पथक निर्माण केले आहे. फक्त याच वाद्यांचा वापर आपल्या मिरवुूकीत करतात. मंडळाचे कार्यकर्ते गुलालाचाही अगदी नाममात्र वापर करताना दिसून येतात.

जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित
मंडळाच्या गणेश उत्सव साजरा करण्याच्या या पारंपरिक पद्धतीची दखल घेऊन २००८ ला शिराढोण पोलिस ठाण्याकडून प्रथम पुरस्कार देवून या मंडळाचा गौरव करण्यात आला होता. २००९ साली जिल्हा पोलिस प्रशासनांकडून जिल्हास्तरीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देवून या मंडळाचा सन्मान करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...