आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तन:चिंचपुरात कोरेगावकर यांचे कीर्तन

परंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांच्या जाण्याने उणीव निर्माण होते ती उणीव भरून येणारी नसली तरी त्यांचे कार्य प्रेरणादायी असते असे प्रतिपादन हभप दयानंद महाराज कोरेगावंकर यांनी चिंचपूर बुद्रुक येथे केले. पंचायत समितीचे माजी सभापती कै. सदाशिवराव (बाबा) पाटील चिंचपूरकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त शुक्रवार (दि.१३) आयोजित कीर्तनात ते बोलत होते.

या वेळी अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, अहमदपुर जि.प. सदस्य मंचकराव पाटील, शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखाना व्हा.चेअरमन प्रकाश पाटील, माजी आमदार ज्ञानेश्र्वर पाटील, जि.प. उपाध्यक्ष धनंजय सावंत, ॲड. दादासाहेब खरसडे, दादासाहेब पाटील, आण्णासाहेब देशमुख, विजयसिंह थोरात, नवनाथ जगताप, बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, सुभाषसिंह सद्दीवाल, ॲड. सुभाष मोरे, डॉ. प्रतापसिंह पाटील, ॲड. शंकर थोरात, ॲड. अरविंद कदम, संतोष शहा, रमेशसिंह परदेशी, ॲड. श्रीकांत भालेराव, चाँदपाशा शेख, ॲड. गणेश खरसडे, दिपक भांडवलकर, बिभीषण हांगे, श्रीकृष्ण ऐतवाडे, महावीर इतापे, बालाजी नेटके, ॲड. रवींद्र सोनवणे, दत्ता तांबे, जयसिंग बिडवे, विष्णू शेवाळे, लक्ष्मण खरतुडे, ॲड. अमोल पाटील आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

हभप कोरेगावकर महाराज पुढे म्हणाले की, कै. पाटील यांच्यात एवढ शौर्य होत कि त्यांनी वाघ पाळण्याचं धाडस केलं होतं. असाच वाघासारखा पाटील म्हणजे परंडा पंचायत समितीचे तात्कालीन कार्यकुशल सभापती कै. सदाशिवराव (बाबा) पाटील होत. ते आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहिले.

यावेळी गायन साथ विठ्ठल महाराज जाधव वाकीकर व भजनी मंडळ यांनी दिली तर सूत्रसंचालन अशोक महाराज चिंचपूरकर यांनी केले. प्रतिमा पूजन जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती रणजितसिंह पाटील, युवराजसिंह पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...