आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग 3 मधून निवड:मोर्डा-तडवळा ग्रामपंचायत सदस्यपदी कोळेकर बिनविरोध

काक्रंबा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील मोर्डा तडवळा ग्रामपंचायत निवडणुकीत तडवळा गावातून प्रभाग क्रमांक तीन मधून आशाबाई सुभाष कोळेकर यांची बुधवारी (दि.७) बिनविरोध निवड झाल्याने ग्रामस्थांच्या फटाक्याची आतषबाजी व गुलाल उधळुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील मोर्डा तडवळा या ग्रुप ग्रामपंचायतच्या ७ जागांसाठी निवडणूक लागली असून ग्रामपंचायतचे सरपंच पद हे एससी महिलेसाठी राखीव आहेत. सध्या याच सात जागांसाठी निवडणूक चुरशीची होत आहे.

असे असताना तडवळा येथून प्रभाग क्रमांक तीनमधुन सदस्य पदासाठी उभा असलेल्या आशाबाई सुभाष कोळेकर यांच्या विरूध्द उभा राहिलेल्या सदस्याने बुधवारी (दि.७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवट दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे आशाबाई सुभाष कोळेकर या बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषणा केली. यामुळे पॅनलप्रमुखासह कार्यकर्ते व ग्रामस्थांनी फटाक्याची आतषबाजी व गुलाल उधळून आनंद उत्साह साजरा केला.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...