आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोरेगाव जि. प. शाळेत सुंदर हस्ताक्षर व सुलेखन वर्ग; अक्षर सुधारण्यासाठी 1 मेपर्यंत रोज तासभर उपक्रम

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोरेगाव या आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर लेखनात सुधारणा व्हावी, सुबकता यावी यासाठी दररोज दुपारी साडेबारा ते दीड वेळेत सोमवार (०४)पासून एक मे या कालावधीत हस्ताक्षर लेखन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या सुंदर हस्ताक्षर लेखन तयारीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन व चार रेघी वही तसेच लेखन साहित्य देण्यात आलेले असून या विशेष उपक्रमाची सुरुवात सोमवारी करण्यात आली. या उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक प्रवीण स्वामी, सहशिक्षिका लक्ष्मी वाघमारे करणार आहेत. विद्यार्थ्यांचा सराव व गृहपाठ अशोक बिराजदार, उमाचंद्र सूर्यवंशी घेणार आहेत. दररोज एक तास याप्रमाणे वर्ग घेण्याचे सुरू केले असल्याची माहिती देण्यात आली.

उपक्रमाचा हेतू
शहरी भागात विद्यार्थ्यांना कोणतेही मार्गदर्शन उपलब्ध होते पण ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. म्हणूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या सुंदर अक्षर उपक्रमाला सुरुवात करण्यात आले आहे. सुंदर हस्ताक्षर हे तीन टप्प्यांत विद्यार्थ्यांना शिकवले जाते. पहिल्या टप्प्यामध्ये अक्षर सुधारणा शिकविल्या जाणार आहेत. खराब हस्ताक्षर म्हणजे खाडातोड, गिचमीड याला खराब अक्षर तर सुंदर हस्ताक्षर म्हणजे दोन अक्षरातील अंतर उंची व त्यासोबत प्रमाणबद्धता हे महत्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...