आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासावित्रीबाई फुले जयंती उत्सव समिती व महात्मा फुले युवा मंचाच्या वतीने मंगळवारी (दि.३) लोहारा येथील शिवनगरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा आरती सतीश गिरी होत्या. प्रतिमेचे पूजन नगरसेविका सुमन रोडगे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार, नगरसेविका शामलताई बळीराम माळी, माजी जि.प.सदस्या मीरा अविनाश माळी, सोसायटी संचालिका सुनंदा क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. करजखेडा ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदी फुलचंद बनकर विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक तथा जिल्हा बोर्ड संचालक अविनाश माळी, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक जालिंदर कोकणे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, माजी पंस. सदस्य दिपक रोडगे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, सोसायटीचे व्हाइस चेअरमन राम क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भगत, पत्रकार निळकंठ कांबळे, भाजप तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सू त्रसंचालन अशोक क्षीरसागर यांनी तर माजी नगरसेवक श्रीनिवास माळी यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.