आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:सरणवाडीतील कृष्णा जाधवची इंडोनेशिया क्रिकेट संघात निवड

परंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सरणवाडी येथील क्रिकेटपटू कृष्णा सुरेश जाधव याची नुकतीच इंडोनेशिया क्रिकेट संघात निवड झाली.

विद्यालयाच्या वतीने तालुका व जिल्हा स्तरीय क्रिकेट स्पर्धात उत्कृष्ट कामगिरी केली होती. कृष्णाच्या अंगातील सुप्त गुण ओळखुन पुणे येथे पदवीच्या शिक्षणासाठी व क्रिकेटच्या सरावासाठी पाठवले. त्यानंतर बंगळुरू येथे जस्ट क्रिकेट ॲकाडमीत खेळाचे प्रशिक्षण घेत असताना कृष्णाचा खेळ पाहुन तेथील प्रशिक्षकानी इंडोनेशिया देशातील क्रिकेट संघात निवडीसाठी शिफारस केल्यामुळे इडोनेशियाच्या संघात निवड झाली.कृष्णा लवकरच इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सरावासाठी जाणार आहे.

कृष्णाला परंड्यातील त्याचे प्रशिक्षक तय्यब मुल्ला मार्गदर्शक तोसिक जिनेरी, अल्ताफ मुल्ला, विजय जानराव आदीचे सहकार्य लाभले आहे. झाली. प्रशिक्षक विजयकुमार माध्यळकर, टी.नसरुद्दीन यांनी इंडोनेशिया येथील क्रिकेट संघासाठी शिफारस केली. परंडा येथील मोहसीन सय्यद याची भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत निवड झाली होती परंतु काहीं तांत्रिक कारणामुळे त्याला सहभागी होता आला नव्हते.

बातम्या आणखी आहेत...