आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णेचे पाणी:मार्च 2024 अखेर जिल्ह्यात खळखळणार कृष्णेचे पाणी

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या २३.६६ टीएमसी पाण्याच्या ११,७२६ कोटी रुपयांच्या कामांना शिंदे-फडणवीस सरकारने सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. त्यानुसार मार्च २०२४ अखेरपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात कृष्णा खोऱ्याचे पाणी आणण्याचा संकल्प असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या पांगरधरवाडी (ता.तुळजापूर) येथील पंपगृहाच्या कामास माजी गृहमंत्री व या प्रकल्पाचे प्रणेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देऊन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध करून जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढवून सर्वसामान्यांच्या घरात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी तत्कालीन पाटबंधारे मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी मराठवाड्यासाठी कृष्णा खोऱ्याचे २१ टीएमसी पाणी मंजूर करून घेतले होते.

प्रकल्पाची क्षमता सात टीएमसी पर्यंत मर्यादीत न ठेवता कामाला गती देण्याची विनंती पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन युती सरकारने हा विषय प्राधान्याने घेत प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे उस्मानाबादकरांचे अनेक दिवसांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...