आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाबासकी:कोरोनासह अतिवृष्टीमध्ये उत्तम कार्य करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा गौरव

उस्मानाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारी, जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी यामध्ये अनेकांचे जीव वाचवण्यात यश आले.त्यासाठी महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे असून,जिल्ह्यात शेतरस्ते, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे आदी कामे चांगली केल्याबद्दल महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अभिमान वाटतो, असे मत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केले.

महसूल दिनानिमित्त सिद्धाई मंगल कार्यालयात सोमवारी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महसूल विभागात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तसेच व १० वी १२ वी परिक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, जिल्ह्यातील अन्य उपविभागाचे एसडीओ, सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी संघटनेचे गोपाळ आकोसकर, महसूल कर्मचारी संघटनेचे श्री.काळे, पोलीस पाटील संघटनेचे सुभाष कदम, कोतवाल संघटनेचे संपत माने आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या होत्या. त्यांच्या पत्नी, वारसांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. महसूल हे जमीनीशी संबंधीत जबाबदारीचे खाते आहे. नियमानुसार कामे केल्यास प्रशासनाचा नेहमी वचक राहतो.चुकीची कामे कोणीही करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन यावेळी त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले. यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट कार्य केलेल्या अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,अव्वल कारकून,मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, तलाठी, पोलीस पाटील, शिपाई, वाहन चालक, कोतवाल आदींचा सन्माचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला. तसेच महसूलमधील अधिकारी, गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यात आला.

अनेकांचे जीव वाचविले
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात दोनदा अतिवृष्टी झाली. यात अनेकांचे जीव वाचवण्यात महसूल विभागाला यश आले. महसूल कर्मचाऱ्यांनी केलेले नुकसानीचे पंचनामे तर न्यायालयाने मान्य केले आहेत. नुकसानीची मदत वाटप करण्यात आली. जिल्ह्यात ९०० किलोमिटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते करण्याचे मोठे काम झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...