आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:कुंभेफळ अंगणवाडीची मागील पाच वर्षापासून दुरवस्था

परंडा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कुंभेफळ येथील अंगणवाडी मागील पाच वर्षापासून अत्यंत दुराअवस्थेत असुन त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्याकड़े सोमवार (दि.१२) निवेदनाद्वारे करण्यात आली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुंभेफळ येथील अंगणवाडी मागील पाच वर्षापासून दुरावस्था झाली असुन दरवाजे तुटलेले आहेत छताचे पत्रे फुटलेले असून खिडक्या फरशी तुटलेली आहे.

पर्यायी व्यवस्था म्हणून तलाठी सज्जा असलेली रिकामी खोलीमधे अंगणवाडी भरविली जाते. परंतु त्या खोलीची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे खोली च्या पाठीमागे मोकळ्या जागेत गवत वाढल्याने विषारी सापांचा वावर तिथे असतो आणी त्याच बाजूला या खोलीची मोडकी खिडकी आहे. त्या मधून खोलीमधे विषारी प्राणी आतमधे येण्याची भीती आहे.

अंगणवाडीत बसलेल्या चिमुकल्याला विषारी प्राण्याने चावा घेतला व कांही दुर्घटना घडली या गोष्टीला सरपंच ग्रामसेवक हे जबाबदार असतील, असे निवेदनात म्हटले आहे. यासाठी अंगणवाडीची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. निवेदनावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शाबीर शेख, बापूसाहेब क्षीरसागर, रोहिदास मार्कंड, किशोर गायकवाड, शहर अध्यक्ष अरुण खडके, मधुकर ठोसर, योगेश आवाळे, रियाज शेख, तात्यासाहेब हजारे,बाबुल शेख आदीची स्वाक्षरी आहे.

बातम्या आणखी आहेत...