आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला पाऊस:कुन्हाळी, मुळज परिसरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; काळ्या आई सुखावली

उमरगा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात कुन्हाळी, मुळज आदीसह परिसरातील गावात मंगळवारी (दि.०७) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास मेघ गर्जेनेसह वादळी वारा व मान्सुनपूर्व पावसाच्या जोरदार सरीला सुरुवात झाली, अर्धा तास झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून तूर्त दिलासा मिळेला असल्याने बालकांसह ज्येष्ठ नागरिकांना गारवा अनुभवायला मिळाल्यामुळे शेतकऱ्यांतून जोरदार पाऊस होण्याची आशा व्यक्त होत आहे.

गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात वातावरण बदलाचा मोठा परिणाम झाला असून दिवसा कडक उन्हाची तीव्रता आणि पहाटे वादळी वारे होत आहे. अवेळी होणारा पाऊस झाल्यामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून तूर्तास दिलासा मिळला आहे. दोन दिवसापूर्वी त्रिकोळी शिवारात जोरदार पाऊस झाला होता. गेल्या तीन दिवसापासून सायंकाळचे दरम्यान मोजक्याच भागात पाऊस होत असलातरी वातावरणातील बदलामुळे तालुक्यात गारवा निर्माण झाला आहे.

दिवसा उन्हाचा कडाका वाढल्याने बालक, जेष्ठ नागरिक उन्हाच्या उकाड्याने हैराण होत आहेत, त्यात वीजेचा लपंडाव सुरु असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मंगळवारी तालुक्यात अनेक गावात ढगाळ वातावरण असल्याने काही प्रमाणात गारवा जाणवू लागला असताना कुन्हाळी, मुळज परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाऱ्यासह पावसाला सुरु झाली होती. शेतकऱ्यांनी पेरणीपुर्व मशागतीची कामे पूर्ण करून ठेवून मान्सूनपुर्व पावसाच्या प्रतीक्षेत असताना काही भागात पावसाने आगमन केल्याने तालुक्यात नागरिकांना कडक उन्हापासून दिलासा मिळाला असल्या तरी शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. रात्रीच्या वेळी वीजेचा गडगडाट व ढग भरून असल्याने रात्री पावसाची शक्यता दिसून येत होती.

बातम्या आणखी आहेत...