आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह आढळला:भूम; अनोळखी मृतदेह आढळला

भूम5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात रवींद्र हायस्कूल जवळील डोंगरावर बुधवारी रात्री अनोळखी ३५ ते ४० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. त्यामुळे हा घातपात की, खून, याचीच चर्चा तालुक्यात सुरू आहे. पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेहाच्या अंगावर काही जखमा असल्याने घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, मृताची ओळख पटली नसल्याने मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

अनोळखी इसमाचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला त्या घटनास्थळाला गुरुवारी अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत कावँत, भूमचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे यांनी पाहणी करून ग्रामीण रुग्णालय येथे ठेवण्यात आलेल्या मृतदेहाची पाहणी केली. तसेच वैद्यकीय अधिकारी विजयकुमार सुळ यांच्याशी चर्चा केली. यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह उस्मानाबाद येथील सिव्हिल रुग्णालयात ओळख पटवण्यासाठी शव केंद्रामध्ये पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत तवार हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...