आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणी:भूम; आज तहसिल कार्यालयात दोन्ही ग्रामपंचायतीची मतमोजणी

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वारेवडगांव - कासारी व वांगी ( खु ) या दोन्ही ग्रामपंचायतच्या निवडणूकीच्या मतमोजणीस सकाळी साडे आठ वाजता ( ८:३० ) सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी तहसिल कार्यालयातील सभागृहात होणार असून एकाच टेबलवर तीन फेऱ्यात मोजणी करण्यात येणार आहे. प्रथम मतमोजणी वारेवडगाव - कासारी या ग्रामपंचायतची होणार असून या ठिकाणी आठ सदस्य अगोदरच बिनविरोध निवडून आलेले आहेत.

मतमोजणी ही सरपंच व एका सदस्याची मतमोजणी होणार आहे. या नंतर वांगी (खु) ग्रामपंचायतची होणार आहे. या ग्रामपंचायतचे तीन सदस्य यापुर्वी बिनविरोध निवडून आले असून सरपंच व चार सदस्यांची मतमोजणी होणार आहे. ही मतमोजणी तहसिलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या उपस्थित होणार आहे. तालुक्यात राज्यातील सत्तातंरानंतरची ही पहिलीच निवडणूक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...