आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यासह शहराचे ग्रामदैवत श्री अल्लमप्रभू यात्रा महोत्सवासाठी भूम पोलिस प्रशासनाद्वारे तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ग्रामदैवत अलमप्रभू मंदिर यात्रा मार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. श्री अलमप्रभू यात्रा महोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच या यात्रेला गालबोट लागू नये, म्हणून पोलिस प्रशासनाद्वारे पूर्ण खबरदारी घेण्यात आली असून संपूर्ण शहरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यामध्ये पोलिस अधीक्षक डॉ. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून विभागीय पोलिस उपअधीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनात भूम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनात पाच अधिकारी, ७० पोलिस कर्मचारी व एक दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. शहरातील ओंकार चौक ते अलमप्रभू मंदिरापर्यंत अधिकारी-कर्मचारी तैनात राहणार असून, यामध्ये साध्या गणवेशात काही पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी बारीक नजर ठेवणार आहेत. तसेच प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना ठरवून दिलेल्या हद्दीत कार्यरत राहावे लागणार आहे, असे साळवे यांनी सांगितले.
भाविकांनी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी
शहरातील श्री अल्लमप्रभू यात्रेनिमित्त भाविक-भक्तांची मोठी गर्दी होणार आहे. यावेळी भाविक -भक्तांनी मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची काळजी घ्यावी, तसेच पाकिटमारांपासून सावधगिरी बाळगावी. यादरम्यान काही अनुचित प्रकार आढळून आल्यास भूम पोलिस ठाण्यात संपर्क साधवा.- मंगेश साळवे, पोलिस निरीक्षक, भूम.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.