आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:44 लाखांतून सिमेंट रस्ता, नाली कामाचे भूमिपूजन

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपरिषद बांधकाम विभागाच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत शहरातील विकासनगरात ४४ लाख ३५ हजार रुपये खर्चाच्या सिमेंट रस्ता व नाली कामाचे भूमिपूजन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, नगरपरिषद मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे, माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांच्या हस्ते रविवारी (दि.५) झाले. मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला. दर्जेदार कामासाठी प्रभागातील लोकप्रतिनिधी व ठेकेदारानेही लक्ष द्यावे, अशा सूचना खासदार ओमराजे यांनी दिल्या. आमदार कैलास पाटील यांनी शहरासह मतदारसंघात विकासकामांना निधी कमी पडणार नाही, असे आश्वस्त केले. मकरंद राजेनिंबाळकर यांनी शहरविकासाठी कटीबद्ध असून लवकरच शहराचे रुप पालटल्याचे दिसेल, असे मत व्यक्त केले. भूमिपूजनास शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, शहरप्रमुख संजय मुंडे, युवक नेते पंकज पाटील, मा. नगरसेवक बाळासाहेब काकडे, रोहित निंबाळकर, नगर अभियंता विधाते, हनुमंत देवकते, रहेमान काझी, कुणाल धोत्रीकर, गणेश राजे, दशरथ भालेकर, रमेश ढवळे, सुखदेव भालेकर, गोविंद कौलगे, दिपक गणेश, अजय सुपेकर, पांडू अण्णा भोसले, नितीन शेरखाने, सुमित पाटील, आकाश खटके, नितीन इंगळे, अभिजीत कोळी, संदीप शिंदे, आकाश राठोड, अशोक रुपदास, संदीप शिंदे, सत्यजित पडवळ, महेश लिमये, अमोल जाधव, संदेश ढवळे, शुभम ढवळे, बापू शिंदे, आशिष साळुंके, अशोक रुपदास, विठ्ठल रुपदास, शहाजी राठोड, शिवसेना पदाधिकारी, विकासनगरातील नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...