आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली असताना दुसरीही मुलगीच झाली:आईनेच घोटला 3 दिवसांच्या लेकीचा गळा, लातुरातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

लातूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील लातूरमध्ये तीन दिवसांच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. पहिली मुलगी असताना दुसरीही मुलगी झाली म्हणून आईनेच आपल्या तीन दिवसांच्या मुलीचा गळा दाबून हत्या केली आहे.

उस्मानाबादमधील लोहारा तालुक्यातील होळी येथे राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेने 26 डिसेंबर रोजी कासार ज्वाला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मुलीला जन्म दिला, त्यांना आधीच एक मुलगी होती. त्यांनी तीन दिवसांनी म्हणजेच 29 डिसेंबरला रुमालाने मुलीचा गळा दाबून खून केला.

तपासात उघड झाले

उपनिरीक्षक किशोर कांबळे यांनी सांगितले की, या प्रकरणी चौकशी केली असता महिलेला दुसरे अपत्य मुलगी जन्माला आल्यानंतर ती नाराज झाली. आणि तिने याच नाराजीतून मुलीचा बळी घेतला. खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी महिलेला अटक करण्यात आली.

अशी घडली घटना

उस्मानाबाद जिल्ह्यातील होळी येथील रेखा किसन चव्हाण ही महिला सध्या लातूर तालुक्यातील एका वस्तीवर वास्तव्याला आहे. यापूर्वी तिला एक मुलगी झाली होती. त्यामुळे यावेळेला मुलगा होईल अशी अपेक्षा रेखाला होती. काटगाव वसंतनगर तांडा नजीकच्या कासार जवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात ती 27 डिसेंबर रोजी प्रसूतीसाठी दाखल झाली. दरम्यान, आरोग्य केंद्रात तिने गोंडस मुलीला जन्म दिला. पण दुसऱ्यावेळीही मुलगी झाल्याने रेखा नाराज झाली.

कुटुंब उद्धवस्त झाले

रेखाने तीन दिवसांच्या बाळाचा गळा दाबून जीव घेतल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीयांना देखील धक्का बसला. रेखा एवढ्या टोकाचे पाऊल उचलेल यावर अनेकांना विश्वास बसत नव्हता. आता रेखा जेलमध्ये असून पहिल्या मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी तिच्या पतीवर आली आहे. रागाच्या भरात रेखाने उचलेल्या टोकाच्या पाऊलामुळे तीचे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...