आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरच्या पानचिंचोली ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम:नियमित कर भरणाऱ्या ग्रामस्थांना देणार 10 लाखांचा अपघात विमा

लातूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील पानचिंचोली ग्रामपंचायतीच्या तत्पर कारभाराची सध्या मोठी चर्चा सुरु आहे. महसूल वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्थानिक पंचायतीने आकारलेला कर नियमित आणि पूर्णपणे भरणाऱ्या गावकऱ्यांना 10 लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

निलंगा तालुक्यातील पानचिंचोली गावात शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत हा अभिनव निर्णय घेण्यात आला. पानचिंचोलीच्या सरपंच गीतांजली हनुमंते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. 2022 मध्ये देखील कर वसुलीमध्ये निलंगा तालुक्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला होता.

एकमताने मंजूर

श्रीकांत साळुंखे यांनी ग्रामस्थांना पंचायत कराच्या 100 टक्के भरणा केल्यास 10 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा संरक्षण देण्यात येईल असा ठराव मांडला. त्यांच्या या ठरावाचे सर्व सदस्यांनी स्वागत करून हा ठराव एकमताने मंजूर केला. कर वसूलीसाठी ग्रामविकास विभागाची यंत्रणा स्थानिक पातळीवर राबत असते.

यावेळी उपसरपंच बब्रुवान जाधव ग्रामपंचायत सदस्य इकबाल मुजावर छायाबाई स्वामी चंद्रकला हनुमंते, रुबिया शेख हर्षदा दिवे आरती कांबळे अनुसया चव्हाण, सत्यजित पाटील, सिद्धेश्वर कांबळे, श्रीमंत जाधव, सुकेशनी कत्ते उपस्थित होते.

गावाचा विकास महत्त्वाचा

पाणचिंचोली गावाची लोकसंख्या 5,947 आहे आणि जवळपास याठिकाणी 930 करदाते आहेत. गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कराचा भरणा करावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. साळुंखे यांनी पीटीआयला या बैठकीत गावाच्या विकासासाठी आणखी काही ठराव मंजूर करण्यात आल्याचे सांगितले.

अभिनव उपक्रमांसाठी ओळख

लातूर जिल्ह्यातील पाणचिंचोली ग्रामपंचायत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी ओळखली जाते. अपघात विमा कवच देण्याच्या या निर्णयाची देखील सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. गतवर्षी देखील आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामपंचायतींकडून कर वसुली मोहिम राबवण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवून एका दिवसामध्ये कोट्यावधींचा कर अदा केला होता.

बातम्या आणखी आहेत...