आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लोहारा येथील स्पर्श रुग्णालयात शुभारंभ; एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी सकस आहार

लोहारा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयात गुरुवारी (दि.१६) एचआयव्हीबाधित बालकांसाठी सकस आहार उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यात आई-वडिलांचा मृत्यू झाला असल्यास अशा बालकांना अधिक अडचणी येतात. अशा बालकांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी अनम फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने ‘द प्राइड इंडिया स्पर्श विहान काळजी, आधार केंद्र, स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर मार्फत उस्मानाबाद जिल्ह्यातील ० ते १२ वयोगटातील ५० बालकांना सकस गुरुवारपासून (दि.१६) सकस आहार सुरू करण्यात आला.

कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, एआरटी सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणालिनी देसाई उपस्थित होत्या. द प्राईड इंडिया विहान काळजी व आधार केंद्र उस्मानाबादच्या वतीने एचआयव्हीसह जगणाऱ्यांना समुपदेशन, शासकीय योजना, सकस आहार, शेळी व कुक्कुटपालन आदी योजनांचा लाभ देण्यात येतो. ५० बालकांना रोगप्रतिकारशक्ती वाढावी व आरोग्यमान उंचावे, यासाठी स्पर्श ग्रामीण रुग्णालय एआरटी सेंटर सास्तूर व अनम फाउंडेशनच्या वतीने सकस आहार भेट देण्यात आला.

डॉ. मृणालिनी देसाई यांनी मुलांना आहार, उपचाराचे महत्त्व पटून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समुपदेशक दीपा पवार, युवराज मोरे, सुधीर रोडगे, डेटा मॅनेजर सुहास साळुंके, औषध निर्माण अधिकारी विक्रम कुंभार, दत्ता पवार, समाधान कदम व स्पर्श रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

आर्थिक, शैक्षणिक मदत
एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी ६ वर्षांपासून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. शैक्षणिक मदत, व्यवसाय उपक्रम व आवश्यक बाबींसाठी आर्थिक व शैक्षणिक मदत केली जाते. याद्वारे आतापर्यंत ४५ बालकांना मदत करुन मुख्य प्रवाहात आणून सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...