आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिझर्व्ह बँकेचे बदलते धोरण, ऑनलाइन बँकिंग व्यवहारामुळे बँकिंग क्षेत्रात खूप मोठा बदल झाला आहे. यामुळे चांगले दिवस येऊन पतसंस्थेची चळवळ देखील राज्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. राज्यात पतसंस्थेची दिवसेंदिवस होणारी प्रगती, आधुनिक तंत्रज्ञानामुळे भावी काळात पतसंस्थांना खूप चांगले दिवस येतील, असे फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. तालुक्यातील मुरुम येथील महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या बसव सहकार भवन संस्थेची नूतन इमारत व महात्मा बसवेश्वर ग्रंथालयाचा शुभारंभ गुरुवारी (१२) करण्यात आला. जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड होते.
श्री महात्मा बसवेश्वर वाचनालयाचे उद्घाटक खासदार ओमराजे निंबाळकर यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार ज्ञानराज चौगुले, बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, प्रा. किरण सगर, प्रा. अनिता मुदकण्णा, सिद्रामप्पा चिंचोळे, भीमराव वरनाळे, पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशंकर वरनाळे, उपाध्यक्ष शरणाप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव उपस्थित होते.
पुढे बोलताना कोयटे म्हणाले की, या पतसंस्थेने तीन वेळा दीपस्तंभ पुरस्कार घेत सभासदांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार व कठोर वसुली यामुळे ही संस्था नावारूपाला येत आहे. माजी खासदार प्रा. गायकवाड म्हणाले की, पतसंस्था महाराष्ट्रात एक आदर्श संस्था म्हणून नावारूपाला आली पाहिजे. याकरिता आर्थिक व वैचारिक समृद्धी या दोन्हींच्या सांगड घालून ही संस्था काम करीत असल्याने या संस्थेची प्रगती दिवसेंदिवस होत असल्याचा विश्वास व्यक्त केला. या वेळी मान्यवरांची भाषणे झाली.
या वेळी नागेश पाटील, मनीष मुदकण्णा, अमृत वरनाळे, अशोक जाधव, श्रीशैल बिराजदार, आनंद बिराजदार, श्रीशैल मायचारी, इंद्रजीत लोखंडे, रणधीर पवार, दत्तात्रय कांबळे आदींनी पुढाकार घेतला. शिवशरण वरनाळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संतोष पवार यांनी सूत्रसंचालन केले. मनोज बोंदर यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.