आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटी:काटी येथील बसस्थानकावर पाणपोईचा शुभारंभ

काटी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे रविवार दि. (३) रोजी बसस्थानकावर ग्रामपंचायत कर्मचारी अनिल गोविंद बनसोडे यांच्या वतीने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, माजी सैनिक श्रीकांत गाटे आदी मान्यवरांच्या हस्ते पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, पंचायत समिती सदस्य रामहरी थोरबोले,पत्रकार उमाजी गायकवाड,मकरंद देशमुख, माजी सैनिक श्रीकांत गाटे, बाळासाहेब भाले, बबन हेडे, रामेश्वर लाडुळकर, दत्तात्रय सोनवणे, नजीब काझी, अनिल बनसोडे, धनाजी गायकवाड, भोलेनाथ बनसोडे, शहाबुद्दीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हयात सध्या कडक उन्हाळा चालू आहे. या काळात प्रवास करणे त्रासदायक असते. हे ध्यानात घेऊन बसस्थानकावर ही सोय करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...