आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा शुभारंभ वाशी तालुक्यातील लाखणगाव येथुन बुधवारी (ता. ११) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक केशव सावंत, वाशीचे गटविकास अधिकारी राजगुरू, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विकास तळेकर यांच्या हस्ते भूमिपूजन करुन करण्यात आला. वाशी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ५ हजार सहाशे दोन घरकुल प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली आहे. २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षासाठी ५ हजार ६०२ मंजूर प्रस्तवापैकी तालुक्यांमधून ६६० घरकुल तयार करण्याचे उ्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या अनुषंगाने लाखणगाव येथील ग्रामपंचायतीला एकूण प्राप्त प्रस्तावापैकी ४३ घरकुल प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. वाशी तालुक्यात घरकुल योजनेचा शुभारंभ लाखणगाव येथून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आला आहे.
यावेळी लाखणगावचे सरपंच एकनाथ लाखे, उपसरपंच लक्ष्मण लाखे, वाशी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माळी, पाऱ्याचे सरपंच अतुल चौधरी,लाखणगावचे माजी उपसरपंच अशोक लाखे, ग्रामसेवक तुकाराम भिरारी , सर्व ग्रामपंचायत सदस्य, घरकुल लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.