आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वयोश्री योजनेच्या नोंदणी अभियानाचा शुभारंभ; वयोमानानुसार दिव्यांगत्व आलेल्यांना मदत करणारा उपक्रम

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजना व कृत्रिम सहाय्यभूत साधनांचे वाटप करावयाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या हेतूने प्रतिष्ठान भवन उस्मानाबाद येथे योजनेच्या नोंदणी अभियानाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला.

या अनुषंगाने प्रतिष्ठान भवन उस्मानाबाद येथे या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दूरसंवाद प्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, राष्ट्रीय वयोश्री योजना व कृत्रिम सहाय्यभूत साधनांचे वाटप करावयाच्या या दोन्ही योजनांच्या माध्यमातून वयोमानानुसार दिव्यागत्व आलेल्या जेष्ठ नागरिकांना व दिव्यागांना मोठी मदत केली जावू शकते. सरकारने आवर्जून उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश यामध्ये केला आहे. मात्र राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे या योजनेची अंमलबजावणीच जिल्ह्यात झाली नाही. या योजनेचे तीन टप्पे असून पहिल्या टप्प्यात नोंदणी, दुसऱ्या टप्प्यात तपासणी व अनुषंगिक उपकरणांचे मोजमाप तर तिसऱ्या टप्प्यात उपकरणांचे वाटप करण्यात येते.ग्राहक सेवा केंद्रांच्या (CSC) माध्यमातून लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...