आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहसंमेलन उत्साहात:लावणी, लोकगीत, शेतकरी नृत्यासह‎ नाटिकेतून विद्यार्थ्यांचा कलाविष्कार‎

लोहारा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील धानुरी येथील‎ विद्यामाता इंग्लिश स्कूलचे वार्षिक‎ स्नेहसंमेलन शुक्रवारी (दि.३)‎ उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी‎ विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य‎ सादर करून उपस्थितांची मने‎ जिंकली.‎ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ पंचायत समितीच्या गटविकास‎ अधिकारी शीतल खिंडे होत्या.‎ यावेळी शेतकरी विकास संस्थेचे‎ अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी‎ उपाध्यक्ष अशोकराव जवळगे,‎ किशोर साळुंके, दिपक जवळगे‎ यांची प्रमुख उपस्थिती होती.‎

शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा‎ सोलापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा‎ कार्यक्रम घेण्यात आला.‎ विद्यार्थ्यांनी विविध कला सादर‎ केल्या. त्यामध्ये पारंपारिक गीत,‎ शेतकरी नृत्य, मोबाइल थीम व फनी‎ डान्स, लावणी, व लोकगीत, हिंदी‎ गीतांसह विविध प्रकारच्या गीतांवर‎ नृत्य सादर केले.

तसेच विद्यार्थ्यांनी‎ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या‎ जीवनावर आधारित नाटिका सादर‎ केली. नर्सरीपासून सर्व बाल‎ कलाकारांनी आपली कला सादर‎ केली. तसेच दापोली येथे‎ लाठीकाठी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये‎ सुवर्णपदक पटकावलेल्या व‎ ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्णपदक‎ पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा‎ मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात‎ आला.

या कार्यक्रमासाठी‎ पालकांची मोठ्या प्रमाणात‎ उपस्थिती होती. अतिशय‎ मनमोहक, आकर्षक व नवचेतना‎ देणारी कला या ठिकाणी मुलांनी‎ सादर केली. या कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन ओम सूर्यवंशी यांनी‎ केले तर सुनील कांबळे यांनी‎ आभार मानले. कार्यक्रम यशस्वी‎ करण्यासाठी सर्व शिक्षक व‎ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम‎ घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...