आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिसरातील शेतीसाठी लाभ:कजगावात तितूरवरील केटीवेअरला गळती

कजगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तितूर नदीवर उभारण्यात आलेल्या केटी वेअर बंधाऱ्यातून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे बंधाऱ्याचा उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. कजगाव येथील तितूर नदीवरील केटी वेअर बंधऱ्याच्या पाट्यांमधून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात अडवण्यात आलेले पाणी वाहून जात आहे. पावसाळ्यात नदीला आलेल्या पुराचे पाणी अडवून, त्याचा परिसरातील शेतीसाठी लाभ व्हावा, भूजलपातळी वाढावी, असा या बंधाऱ्याचा उद्देश आहे. परंतू बंधाऱ्यात टाकण्यात आलेल्या पाट्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. काही दिवसांतच बंधाऱ्यात अडवले गेले पाणी संपेल, अशी स्थिती आहे. वाहून जाणाऱ्या पाण्याचा शेतकरी वर्गाला काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तात्काळ या पाट्यांची दुरुस्ती करून केटीवेअरमधून होणारी नासाडी थांबवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...