आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधानाचे वाचन:नफरत छोडो..यात्रेचे शहरात स्वागत ; मान्यवरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले

उस्मानाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर येथून निघालेल्या नफरत छोडो, संविधान बचाव यात्रेचे उस्मानबादेत काँग्रेसच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. ८ नोव्हेंबरला नांदेड येथे यात्रा पोहोचणार आहे.यात्रेचे प्रमुख ललीत बाबर, सुभाष लोमटे, मानव कांबळे, वर्षा देशपांडे यांचे स्वागत केले. काँग्रेस विज्ञान तंत्रज्ञान व कौशल्य विकास विभागाचे जिल्हाध्यक्ष अंकुश पेठे व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत झाले. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विजय बनसोडे, विजय गायकवाड, सुभाष लोमटे, माधवसिंग राजपूत, विश्वनाथ तोडकर आदींचे भाषण झाले. यावेळी नफरत छोडो, भारत जोडो, हम सब एक है, भारतीय संविधान जिंदाबाद, अशा घोषणा देण्यात आल्या. शेवटी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सर्वांना शपथ देवून वाचन करण्यात आले.

आभार पोपट लांडगे व पुष्पकांत माळाळे यांनी मानले. यावेळी गणेश वाघमारे, अब्दुल लतीफ, संजय गजधने, राजेंद्र धावारे, बाबा कांबळे, डॉ. रमेश बनसोडे, अतुल लष्करे, महादेव एडके, बनसोडे दादा, जनार्धन वाळवे, नवज्योत शिंगाडे, कैलास शिंदे आदींची कार्यक्रमास उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...