आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी बातमीचा परिणाम:उमरग्यामध्ये 57 पैकी 38 स्ट्रीट पोलवर अखेर बसवले एलईडी दिवे; दीड कोटींच्या मंजूर निधीतून 15 महिन्यांपूर्वी काम झाले होते

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील मुख्य रस्त्यावर स्ट्रीट लाईट पोल बसवणे, शहरात महत्वाचे चौकात हायमस्ट दिवे बसविण्याच्या कामांसाठी दिड कोटी रुपयाचा निधी मंजूर केले असून १५ महिन्यापूर्वी उदघाटन झाले तर नऊ महिने झाले स्ट्रीटलाईट पोल उभारून केबल टाकण्यात आले असताना ७० टक्के पोलवर अद्यापही दिवे लावण्यात आले नसल्याचे वृत्त ३० सप्टेंबर रोजी प्रसिध्द झाले होते. याची दखल घेत सोमवारी रात्री ५७ पैकी ३८ स्ट्रीटपोलवर दिवे लावण्यात आले आहेत. अद्याप १९ खांब दिव्याच्या प्रतीक्षेत आहेत.

शहरातील राष्ट्रीय महामार्ग रस्ता दुभाजकावर बसस्थानक ते आदर्श महाविद्यालय तीन किलोमीटर अंतरावर स्ट्रीट लाईट साठी ८२ पोल उभारणे आणि शहराच्या अंतर्गत भागातील महत्वाच्या ठिकाणी ३० हायमस्ट दिवे बसवण्याचे कामाचा शुभारंभ १३ जून २०२१ ला झाला होता. राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता दुभाजकावर शहरातील बसस्थानक ते आदर्श महाविद्यालयाचेपर्यंत स्ट्रीट पोल आणि केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान केबल टाकण्यासाठी साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर रस्ता दुभाजकावर स्ट्रीट पोल उभारले असलेल्या पोलसाठी केबल टाकताना रस्ता दुभाजक, रस्ता क्रॉसिंग आणि महामार्ग फोडून केबल टाकण्यात आले आहे. रस्ता व दुभाजक पूर्ववत काम करून देण्याची जबाबदारीही संबंधीत ठेकेदाराची असतानाहि नऊ महिने झाले तरी तसेच ठेवण्यात आले आहे. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत किंवा ठेकेदाराला कोण पाठीशी घालत आहे काय असा प्रश्न विचारला जात आहे.

संबंधित ठेकेदार, पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता व दुभाजक पूर्ववत करून घ्यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.उर्वरीत भागात किमान दिवाळीपर्यंत तरी शहरातील सर्व भाग प्रकाशमय होतील अशी नागरिकांना अपेक्षा आहे.

अद्याप १९ पाेल प्रतीक्षेत
शहरात दीड कोटी रुपयातून राष्ट्रीय महामार्गावर ८२ स्ट्रीट लाईट पोल व अंतर्गत भागात ३० ठिकाणी हायमास्ट पोल उभारण्यात आले आहेत. हायमास्टचे अनेक भागात काम अपूर्ण असून स्ट्रीट पोल वरती केवळ २५ ठिकाणी एलईडी दिवे लावण्यात आले असून त्यातील अनेक दिवे बंद पडले आहेत.

५७ पोल नऊ महिने झाले तरी दिव्यांच्या प्रतीक्षेत होते. अखेर सोमवारी (दि. ३) रात्री ५७ पैकी ३८ स्ट्रीटपोलवर दिवे लावण्यात आले असून उर्वरीत १९ पोल अद्याप एलईडी दिव्याच्या प्रतिक्षेत आहेत. सदर काम निकृष्ट झाल्यामुळे अनेक पोल झुकले तर एलईडी दिवे कमी व्हॅटचे असल्याने पोल जवळ उजेड तर बाकी अंधारच राहत आहे.

बातम्या आणखी आहेत...