आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदेविषयक मार्गदर्शन:पांगरदरवाडीत शिबिरातून कायदेविषयक जागृती ; विधी सेवा समितीच्या शिबिराचे आयोजन

तामलवाडीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी, काटी, माळुंब्रा येथे रविवारी (दि.६) तालुका विधी सेवा समिती अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले. शिबिरात नागरिकांना कायदेविषयक माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापूर सहदिवाणी न्यायाधीश के. एस. कुलकर्णी होते. ॲड. क्रांती कोरके यांनी महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. घोडके, ॲड. एस. के. कुलकर्णी, तामलवाडी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित, पोलिस उपनिरीक्षक रमेश घुले, पांगरदरवाडीचे सरपंच बालाजी शिंदे, ग्रामसेविका महादेवी गलांडे, माजी सरपंच विजय निंबाळकर, बालाजी डोंगरे, शंकर कदम, ॲड. गवळी, सोमनाथ शिंदे, महेश सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. वडणे यांनी केले तर आभार बालाजी डोंगरे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...