आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिव्यांग व्यक्तींना अंतकरणातून सहकार्य करा व त्यांना त्यांच्या हक्क व अधिकाराची माहिती करुन द्या. जेणेकरून दिव्यांग व्यक्ती सक्षम होतील असे आवाहन न्यायमूर्ती एस. एस. कळसकर यांनी केले आहे. लोहारा येथील आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त रविवारी (दि. ४) लोहारा येथे आयोजित विधी साक्षरता शिबिरात ते बोलत होते.
लोहारा विधि सेवा समिती व तालुका विधिज्ञ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिराचे लोक वाचनालय लोहारा येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारा कनिष्ठ स्तर न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. कळसकर हे होते. यावेळी लोहारा तालुका विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. महेश जट्टे, श्रीमती एस. आर. भुसणे (तिगाडे), अॅड. मल्लिनाथ वचने, प्राचार्य दौलतराव घोलकर, लोकवाचनालयाचे सचिव माणिक तिगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती एस. एस. कळसकर म्हणाले की, दिव्यांग मुलांमध्ये व्यक्तींमध्ये नैसर्गिक विशिष्ट कलागुण असतात. ते इतरांना प्रभावित करतात. दिव्यांग व्यक्तींना न्याय हक्काच्या माहिती व्हावी, त्यांचे हक्क अबाधित राहावे, याकरिता विधी साक्षरता शिबिराच्या माध्यमातून कायदेविषयक जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता समाज माध्यमाने दिव्यांग व्यक्तीच्या पाठीशी उभे राहावे व कोणतीही दिव्यांग व्यक्ती हक्क व अधिकारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे मत यावेळी व्यक्त केले. सूत्रसंचालन संतोष बायस यांनी तर अँड मल्लिनाथ वचने यांनी आभार मानले. दत्तात्रय स्वामी, तुकाराम विरूधे, शिवप्पा बोराळे, ग्रंथपाल संजय जेवळीकर, मनीषा महानुर, हुकुम इनामदार, महेश पाटील, विशाल माळवदकर, बाळु पवार, विजय महानुर, अरबाज चाऊस आदी नागरीक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.